400 Years of Silence
In Marathi (400 वर्षाचा शांततेचा काळ)

पवित्र शास्त्रातील “शांततेचा काळ” हा जुना करार आणि नवीन करार यांच्या मधला सुमारे 400 वर्षाचा कालावधी आहे, या कालावधीत परमेश्वराने कोणत्याही संदेष्ट्याद्वारे नवीन वचने दिले नाही किंवा कोणते ही पवित्र शास्त्राचे पुस्तक किंवा शास्त्र लिहिले गेले नाही, म्हणून या कालावधीला ‘शांततेचा काळ’ म्हटले जाते.
पण जरी ही या काळात शास्त्र लिहिले गेले नसतील किंवा संदेष्ट्याद्वारे काही नवीन वचन आले नसेल, किंवा हा काळ आध्यात्मिक दुष्ट्या शांत दिसत होता, तरीही ऐतिहासिक आणि राजनैतिक दृष्ट्या या काळात खूपच घडामोडी झाल्या, ज्यांनी प्रभू येशू च्या आगमनासाठी जगाची तयारी केली.
या काळात इस्रायल वर अनेक प्रकारे वेगवेगळ्या महासत्तानी राज्य केले, ज्यांच्या बद्दल दानिएलच्या पुस्तकात भविषवाणी सुद्धा आढळते.
जसे की पर्शियन साम्राज्य, ग्रीक साम्राज्य, रोमन साम्राज्य.
अलेक्झांड्रियन ने पर्शियन साम्राज्याचा पराभव करून इस्राएल वर ताबा मिळवला, त्या मुळे दोन गोष्टी तिकडे घडल्या - पहिले म्हणजे ग्रीक भाषेचा सर्वत्र प्रसार झाला आणि ग्रीक भाषा व्यापाराची मुख्य भाषा बनली, आणि आपण पाहतो की त्या नंतर पवित्र शास्त्रातील शुभवर्तमान ही ग्रीक भाषेत लिहिले गेले आणि सर्व जग पर्यंत पोहोचले.
तर दुसरे म्हणजे यहुदी संस्कृतीवर ग्रीक भाषेचा आणि संस्कृतीचा त्यांच्या विचारसरणी चा प्रभाव पडला, ज्याला ‘हेलेनायजेशन’ म्हटले जाते, जसे आपण नवीन करारात हेलेनी शब्द ही पाहतो.
इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे राहणाऱ्या यहुदी लोकांसाठी हिब्रू पवित्र शास्त्राचे ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आले, ज्याला LXX सेप्टुजीन्ट (SEPTUAGINT) म्हणजेच सप्तती म्हणतात, हे यासाठी ही म्हणतात कारण हे कार्य 70 विद्वानांनी केले.
म्हणून आपण पाहतो की प्रभू येशूच्या काळातील ग्रीक भाषिक लोकांसाठी शास्त्र उपलब्ध झाले.

पुढे, सिरियाचा राजा अंतियोकस एपिफेनिस याने यहुदी धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जाणूनबुजून पवित्र मंदिरात डुकराची बळी देऊन मंदिराची विटंबना केली आणि अपमान केला.
त्याच प्रकारे त्याने घोषणा दिली की खतना आणि शब्बात पाळण्यावर बंदी घाला.
राजा अंतियोकस याचा छळ खूपच वाढू लागला आणि त्याने यहुदी लोकांना ग्रीक देवी-देवतांची पूजा करायची जबरजस्ती केली आणि त्याने पवित्र मंदिरात झुसचा पुतळा बसवला, म्हणून त्या छळाविरुद्ध मत्तथिया आणि त्याचा मुलगा यहुदा मक्काबी यांनी बंड केले, आणि त्यांनी गनिमी काव्याने ग्रीक सैन्याचा पराभव केला आणि मंदिराचे शुद्धीकरण केले.

या विजयाच्या दिवसाला हनुक्का म्हटले गेले, जे हिब्रू मध्ये (खन्नुका חֲנוּכָּה) असे आहे, ज्याचा अर्थ “समर्पण” आहे. ज्यात ‘मेनोराह’ म्हणजेच ‘दिवे’ यातील फक्त एक दिवस पुरेल इतकेच तेल होते, पण पूर्ण लढाई जिंके पर्यंत ते तेल काही संपले नाही, आणि ते दिवे चमत्कारिक रित्या 8 दिवस चालूच राहिले.


या नंतर यहुदी लोकांनी हास्मोनियन राजघराण्याची स्थापना केली आणि सुमारे 100 वर्ष स्वातंत्र्य अनुभवले
त्या नंतर रोमन जनरल पॉम्पी याने यरुशलेम जिंकले पुन्हा यहुद्यांचे स्वातंत्र्य संपले, पुढे रोमन सरकारने रस्ते बांधले आणि यहुद्यान सोबत शांतता प्रस्थापित केली.
ज्यामुळे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा मार्ग ही मोकळा झाला.
रोमन लोकांनी हेरोद याला यहुद्यांचा राजा म्हणून नियुक्त केले, ज्याने जुन्या मंदिराचा विस्तार करून ते खूपच भव्य बनवले, प्रभू येशूने आपल्या सेवाकार्यात ज्या मंदिरात जात असे ते हेच मंदिर आणि हा तोच हेरोद होता जो प्रभू येशू च्या जन्माच्या वेळेस सत्तेत होता.
याचमध्ये नवीन विचारधारे चे पंत उदयास आले जसे की, परुशी आणि सदुकी. परुशी ते जे नियमशास्त्र आणि रब्बी लोकांनी बनवलेल्या पुस्तकाचे पालन करणारे.
आणि सदुकी ते जे ज्याचा मंदिरात प्रभाव असे आणि केवळ नियमशास्त्र याचेच पालन करणारे होते.
तर अशा प्रकारे या शांततेच्या 400 वर्षांच्या काळामध्ये राजकीय, भाषा आणि धार्मिक गोष्टी आढळून येतात, जे आपल्याला येणाऱ्या मसिहा म्हणजेच ख्रिस्त याचा आगमना पर्यंत पोहोचताना दिसतात.
संदेश रणदिवे.